शिवतेज सोशल फाउंडेशनतर्फे शिवतेज पत्रकार सन्मान २०२४ प्रदान

शिवतेज

पारनेर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वनम) : शुक्रवार दिनांक 26/1/2024 रोजी पारनेर तालुक्यातील बाभूळवाडे येथे शिवतेज पत्रकार सन्मान 2024 सोहळा पार पडला. या कार्यक्रमा मध्ये शिवतेज सोशल फाउंडेशन चे संस्थापक ऍडव्होकेट कृष्णाजी जगदाळे, अध्यक्ष श्री. दिलीपराव बोरुडे, शिवतेज सांस्कृतिक अध्यक्षा सौ. सविता जगदाळे, कार्यअध्यक्ष सौ. अंजुम पठाण, शिवतेज व्यवस्थापिका सौ. रेखा बोरुडे उपस्थित होतें .

शिवतेज सोशल फाउंडेशन चे संस्थापक ऍडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांनी 26 जानेवरीचे अवचिते साधून सर्व पत्रकारांचा सन्मान केला. यावेळी शिवतेज सोशल फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होतें. या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील पत्रकार उपस्थित होतें.आदर्श पत्रकारांचा सन्मान करणे हे समाजातील सर्व व्यक्ती आणि संस्थांचे कर्तव्य आहे यास कर्तव्य भावनेने शिवतेज सोशल फाउंडेशन द्वारे आपला पत्रकार म्हणून मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय प्रजासत्ताकाचे खंबीर पहारेकरी असणाऱ्या पत्रकार बांधवांच्या समाज हितेशी ध्येयवादी समर्पित कार्याला शिवतेज परिवाराने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांनी आपल्या भाषांनातून पत्रकारिता करीत असताना येणारा अनुभव सांगितला .

यावेळी शिवतेज सोशल फाउंडेशन बाभूळवाडे संस्थापक ऍडव्होकेट कृष्णाजी जगदाळे म्हणाले. शिवतेज सोशल फाउंडेशन बाभुळवाडे (पारनेर) आयोजित पारनेर तालुका -नगर जिल्हास्तरावर पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपून ध्येयवादी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ सशक्त, बळकट आणि समर्थ असणे निरोगी लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. समर्पित भावनेने आपल्या लेखणी द्वारे समाजातील विविध समस्या सोडवण्याची ताकद आज पत्रकारितांमध्ये आहे. समाजाचे मन, मेंदू आणि मनगट समर्थ करून एक बलशाली भारत राष्ट्र घडवण्याची शक्ती पत्रकारिता मध्ये आहे. असेही यावेळी बोलताना शिवतेज सोशल फाउंडेशनचे संस्थापक ऍडव्होकेट कृष्णाजी जगदाळे म्हणाले .

कृष्णाजी जगदाळे यांचे सामाजिक, व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. शिवतेज सोशल फाउंडेशन च्या माद्यमातून गरजवंताना ते मदत करतात. शिवतेज सोशल फाउंडेशन बाभुळवाडे येथे अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यकर्माचे आयोजन केले जाते व उपक्रम राबविले जातात.शेवटी कार्यक्रमाचा समारोह शिवतेज सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व पत्रकारांना उत्तम स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here