टपाल खात्याचा भोंगळ कारभार; प्रशासनाने दखल घेण्याची गरज

टपाल

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमिला टेमगिरे) : जुन्नर /आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची टपाली पोस्ट खात्याच्या काही काम चुकार कर्मचाऱ्यांमुळे गहाळ होत असल्याने, व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करणारे पत्र अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा सहसचिव नितीन मिंडे व आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन पारंपारिक टपाल पेटी मध्ये टाकून टपालाद्वारे पाठवून केली आहे*

याबाबत अधिक माहिती अशी की आंबेगाव /जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात जनतेची रजिस्टर स्पीड पोस्ट प्रकाराने आलेली टपाले पोस्टाचे काही कर्मचारी वाडी वस्तीवर जाऊन घरपोच न देता गावातील हॉटेल, मेडिकल, किराणा दुकाने किंवा शालेय विद्यार्थ्यांकडे किंवा पान टपरीवर ठेवतात ,प्रत्यक्ष ज्यांचे टपाल आहे त्या जबाबदार व्यक्तीकडे न देता इतरत्र ठेवतात -प्रत्यक्ष हातात देत नाहीत, यामध्ये विशेष असे की टपाल प्राप्त करण्याची सही न घेता गैर-माणसांची सही घेऊन टपाले वितरित करतात.
याचा नागरिकांना मोठा फटका बसतो ,महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होतात व दुबार करण्यासाठी वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. ही फारच गंभीर बाब आहे .अशा अनेक तक्रारी आंबेगाव तालुका ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांकडे नागरिकांनी कळवल्याचे तालुका अध्यक्ष सुभाष मावकर यांनी सांगितले

सदर टपाल पारंपारिक पद्धतीने टपाल पेटी द्वारे पाठविताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा सहसचिव नितीन मिंडे,आंबेगाव तालुकाअध्यक्ष सुभाष मावकर , महसूल समिती प्रमुख कैलास मावकर ,चांडोली बुद्रुक गाव संघटक संतोष थोरात ,सदाशिव थोरात रोहिदास मावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here