जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शकील पिंजारी) : दिनांक ०६/०२/२०२४ रोजी, इत्तेहाद एजुकेशन सोसायटी द्वारा संचलित अंग्लो उर्दू हायस्कुल, सावदा येथे इयत्ता १० च्या विद्यर्थ्यांचा ” निरोप समारंभ चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी इयता ५ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थी उपसथित होते या.कार्यकर्माची सुरुवात पवित्र कुरान पठन करून झाली. त्या नंतर बहुतेक विधार्थ्यानी आपले यावेळी मनोगत व्यक्त केले. नवेद सर् यानी अलविदाई गीत गायन केले तर युनुस सर यांनी विधार्थ्याना यावेळी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन इकबाल शेख कादर तसेच सचिव अकरम खान यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे नूतन मुख्यध्यापक सईद सर यानी भूषविले. कार्यकर्माच्या यशस्वी साठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी परिश्रम घेतले.







