नवी मुंबई (प्रतिनिधी) : मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे यांच्या सुचनेनुसार बडोदे येथे राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी काळात सामाजिक उपक्रम राबवण्या बाबत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
प्रसंगी गुजरात राज्य युवा अध्यक्ष प्रतापराव मोहिते, गुजरात राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे, नयन सपकाळ , प्रदीप(राजू) मोरे ,संजय मोहिते , रुपेश मिस्त्री ,चंद्रकांत शेलार, श्रीराम कालगुडे, रोहित मोरे, किरण पवार ,रामचंद्र गायकवाड किरण पवार, एम व्ही मालुसरे यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते







