नवी मुंबई (प्रतिनिधी) : मराठा क्रांती स्वराज्य संघटना सामाजिक क्षेत्रातील योगदान देत सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य,रोजगार उद्योग निर्मिती भर देत स्तुत्य उपक्रम यशस्वी राबवून देशभर खेडोपाडी पोहचणार असुन माझे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते संघटना वाढीसाठी अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी दैनिक बेधडक महाराष्ट्र जवळ बोलताना सांगितले.
या वेळी बोलताना भोसले यांनी सांगितले येत्या काळात हरियाना पंजाब राजस्थान गोवा मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू ,आंध्र प्रदेश गुजरात नवी दिल्ली हिमाचल प्रदेश राज्यातील मराठा बांधव व नेते यांच्या भेटीगाठी घेण्याचे नियोजन राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम करत असुन राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप मोरे तसेच राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांच्या सह राष्ट्रीय व राज्य महत्त्वाचे पदाधिकारी सामील असतील असे प्रतिपादन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले.
सध्या अकरा राज्यात मोठ्या प्रमाणात समाज बांधव जोडले गेले आहेत. तेथे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते समाजाची एकजूट परराज्यात आवश्यक बाब झाली असुन अनेक राज्यात समाज बांधव यांच्यावर अन्याय होतो. त्या मुळे मराठा क्रांती स्वराज्य संघटना एक आधारवड म्हणुन देखील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव यांनी स्वीकारली आहे. अनेक राजे महाराजे संस्थानिक यांच्या सह हजारो दिगज्ज मराठे सामील होत विविध प्रकारच्या समाज उपयोगी कार्यक्रम यशस्वी पार पाडत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे बोलताना भोसले यांनी सांगितले. सध्या संघटनेची बांधणी सुरू असून लवकरच आजीव सभासद व देशभर सदस्य नोंदणी देखील काम सुरू करण्यात येणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप मोरे यांनी केले.







