मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षापदी प्राचार्य सौ. सारिका यादव

सारिका यादव

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ वैशालीताई गलगटे यांनी ही निवड जाहीर केली.

यावेळी बोलताना राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी सांगितले सौ. सारिका संदिप यादव या कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभाग कार्यकारिणी सदस्य असुन माले हायस्कूल प्राचार्य पदी कार्यरत आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून अनेक सामाजिक संस्थानवर पदाधिकारी म्हणुन देखील सक्रीय सहभागी आहेत.

त्यांच्या निवडीची घोषणा होताच पश्चिम महाराष्ट्र महिला कार्यकारिणी मध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. एक सुस्वभावी मनमिळाऊ स्वभावाचे महिला पदाधिकारी लाभल्याचे राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा सौ संध्याताई राणे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले असुन शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या.

राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड आनंदराव भोसले मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेशराव शेजवळ नगर जिल्हा अध्यक्ष दीपकराव धट पाटील कोकण प्रदेश सचिव प्राचार्य रविंद्र जाधव वसई विरार नालासोपारा अध्यक्ष जितेंद्र पालांडे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ सुनीता देठे शहर महिला अध्यक्षा डॉ.सौ सीमा पवार कोकण प्रदेश महिला अध्यक्षा सौ सोनाली अविनाश कदम आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील अभिनंदनाचा वर्षाव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here