जुहू येथे विवस्त्रावस्थेत काढली अल्पवयीन भावंडांची धिंड

crime
File Photo

मुंबई (क्राइम रिपोर्टर ज्योतीराम काटकर) : मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर फिरणाऱ्या दोन अल्पवयीन (१४ आणि १७ वर्षे) भावंडांना चोर समजून स्थानिकांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हेतर, विवस्त्र करून त्यांचे केस कापले आणि साखळीने बांधून परिसरात धिंड काढून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.



या दोघांना रात्रभर बांधून ठेवले होते. ही धक्कादायक घटना विलेपार्ले परिसरात घडली. हा संतापजनक प्रकार २३ सप्टेंबरला पहाटे तीनच्या सुमारास विलेपार्लेतील राहुल मेडिकलच्या बाजूला नायडू चाळ येथे घडला.



विलेपार्लेतील ६० वर्षीय पेरुमाई चिनरास देवेंद्र या त्यांच्या दोन नातवांसोबत राहतात. त्या कचरा वेचण्याचे काम करतात. दोन्ही मुले त्यांच्या मुलीची आहेत. मुलीचे निधन झाल्यानंतर तिच्या पतीनेही मुलांची जबाबदारी झटकली. तेव्हापासून दोघेही आजीसोबत राहतात. पेरुमाई यांच्या तक्रारीनुसार, २३ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता नातवांना स्थानिकांनी मारहाण केली. तसेच त्यांचे विवस्त्रावस्थेत धिंड काढलेले व्हिडीओ फेसबुकवर शेअर केल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.


तीन ते चार पुरुष आणि महिला दोन्ही मुलांना विवस्त्र करीत त्यांचे केस कापून, त्यांचे हातपाय साखळीने बांधून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत ओढत नेताना व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर पेरुमाई यांनी दोघांचा शोध घेताच ते परिसरात जखमी अवस्थेत सापडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here