सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल; चाहत्यांना चिंता

rajanikanth

मुंबई (चित्रपट प्रतिनिधी गणेश तळेकर) : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा थलैयवा सुपरस्टार रजनीकांत. काल रात्री उशीरा रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार रजनीकांत यांना मध्यरात्री पोटदुखी सुरु झाली होती. याशिवाय रजनीकांत यांना ब्लड प्रेशरचा त्रासही सुरु झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज १ ऑक्टोबरला रजनीकांत यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती ठीक असून काही वैद्यकीय तपासण्या करुन त्यांना घरीही सोडण्यात येईल.

रजनीकांत यांचा ‘वेट्टैयान’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रजनीकांत अनेक वर्षांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहेत. ‘वेट्टैयान’ हा रजनीकांत यांचा १७० वा सिनेमा आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा या सिनेमाचा टीझर रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला चांगलीच पसंती दिली. १० ऑक्टोबरला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात ‘आवेशम’ स्टार फहाद फाजिल सुद्धा दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here