ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे ग्रामस्थांना मिळणार तातडीने मदत

gram-suraksha-yantrana

पन्हाळा (रिपोर्टर अनिल सांगळे) : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीरित्या कार्यान्वित करण्यासाठी, मा.पोलीस अधीक्षक, कोल्हापूर व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने कोडोली पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांसाठी दि. 30/09/2024 रोजी सोमवार सकाळी 10.00 वाजता कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमासाठी मा.श्री डी.के. गोर्डे साहेब,(संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा),जी.एम. लोकरे,साहेब(वरिष्ठ अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा), मा.श्री कैलास कोडग साहेब (API, कोडोली पोलीस स्टेशन), हे व्यासपीठावर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये, मा.श्री डी. के.गोर्डे साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, चोरी, दरोड्याची घटना, अपहरण,महिला संदर्भातील गुन्हे,लहान मुले हरवणे,वाहन चोरी,गंभीर अपघात,वन्य प्राण्यांचा हल्ला,आगजळीताची घटना इत्यादी घटनांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600 या नंबर वर नागरिकाने संकट काळात कॉल केल्यास त्याचा आवाज गावातील सर्व नागरिका पर्यंत पोहोचतो व तातडीने मदत मिळवणे व दुर्घटनांना आळा घालणे सहज शक्य होते असल्यामुळे, ही यंत्रणा कश्या प्रकारे काम करते व अपात्कालीन परिस्थितीत याचा कश्या पद्धतीने वापर करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवले त्यांनी सांगितले की ही सेवा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितीना केले,

कार्यक्रमासाठी, कोडोली पोलीस स्टेशन चे गोपनीय अमलदार कृष्णात पाटील ,पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील,पत्रकार बांधव,ग्रामसेवक,सरपंच,, ऑपरेटर,राशन दुकानदार,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,गणपती व नवरात्र मंडळ सदस्य,शांतता कमिटी सदस्य,महिला दक्षता समिती सदस्य,सोनार दुकानदार,व्यापारी,बँक अधिकारी-कर्मचारी,पतसंस्था अधिकारी-कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here