जळगाव (प्रतिनिधी अशोक फुलपगारे) : जळगाव जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, जळगाव तर्फे श्री गणेश मिरवणूक व श्री गणेश आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे परीक्षण उत्कृष्ट पध्दतीने केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वरी रेड्डी यांच्या हस्ते चित्रकार तथा मानवसेवा विद्यालयाचे चित्रकार सुनिल दाभाडे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी उपविभागीय पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व पोलीस अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.







