अ.भा. किसान काँग्रेसच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्षपदी जळगाव येथील सुनील पाटील यांची नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी जोतिराम काटकर) : अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी तसेच उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून जळगाव येथील सुनील पाटील यांची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडणारे तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांना मिळणाऱ्या सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणून सुनिल पाटील ओळखले जातात.

अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वय व महाराष्ट्र प्रभारी प्रकाश घाले, राष्ट्रीय समन्वय ॲडवोकेट जीवन दत्त आरगडे यांच्या आदेशाने किसान काँग्रेस महाराष्ट्राचे अध्यक्ष पराग फाष्ठे यांनी त्यांची निवड केली. अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते आज काँग्रेस मुख्यालय, टिळक भवन, मुंबई येथे त्यांना देण्यात आले.

 

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील पाटील यांची अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय सहसमन्वयक सुरेश शेट्टी यांच्यासह पक्षातील मान्यवर व समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here