सावदा पोलीस पथकाने पकडला दोन लाखाचा सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा; दोन जण ताब्यात

savada-crime

सावदा (क्राइम रिपोर्टर अजहर खान) : महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे उत्पादन, विक्री, वितरण व साठा तसेच वाहतुक यासाठी प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा हा कब्जात बाळगून पुरवठा करणेसाठी वाहतुक करतांना दोन आरोपींविरुध्द आज (दि.२४) सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांचे कडून दोन लाखाच्यावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

सावदा पोलीस स्टेशन हद्दीत अनिल ओंकार पाटील वय-४०, रा.शिवाजीनगर जळगाव व रोहीत मुकेश बरकले, वय-२२ रा.शिवपुर, ता.भुसावळ हे सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करणेसाठी वाहतुक करित असलेबाबतची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाल्या वरून त्यांनी तात्काळ सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस पथकास रवाना केले.

 

सापळा रचुन दोघांना लुमखेडा ता.रावेर शिवारात सावदा ते हतनुर धरण रोडवर पाटाचे चारीजवळ पकडुन त्यांचेजवळ दोन लाख पाचशे साठ २,००,५६०/-रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा मोटार सायकलीसह पथकास मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल सानप,पोहेकाँ संजीव चौधरी,पोकाँ सुनिल कुरकुरे,पोकाँ बबन तडवी यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here