पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोनसाखळी चोरट्यांना केले जेरबंद

pandharpur-crime

दोघांकडून अंदाजे १२ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण प्रितम यावलकर यांचे सूचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये सहा पोलीस उपअधिक्षक पंढरपुर विभाग पंढरपुर डॉ अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत छोडके यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीसांनी दोघा सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केले असून, त्यांच्याजवळून अंदाजे १२ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठाणे गुरनं ५२५ / २०२४ बीएनएस ३०९ ( ४ ), ३ (५) प्रमाणे दिनांक २८/०८/२०२४ रोजी फिर्यादी नामे डॉ. सौ. मैत्रेयी मंदार केसकर वय ४५ वर्षे रा. शाकुंतल नगर, इसबावी, पंढरपूर यांच्या अंगावर चटणी टाकुन त्यांना ढकलुन देवून गळयातील ४४.६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण काळे मनी व सोन्याच्या वाटी असलेले बळजबरीने हिसकावुन तोडून जबरी चोरी करून तेथुन दोन अज्ञात इसम मोटार सायकल वरून निघुन गेले आहेत म्हणून अज्ञात इसमांविरुध्द पंढरपुर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी यांचे दोन पथक तयार करून पेट्रोलिंग करण्या करीता रवाना केली व ट्रैफिक कर्मचारी यांना नाकाबंदी करून अज्ञात मोटार सायकल वरील आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या.

अज्ञात आरोपीचा व मोटार सायकलचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी स्टेशन रोड ते टाकळी रोड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयीत इसम मोटार सायकल वरून जात असताना दिसले त्यांना मोटार सायकल थांबविण्यास सांगितले असता ते मोटार सायकल वरून पळुन जात असताना पडले. त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणल्यानंतर दोन पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी नामे १) विनोद गोविंद पिंपळे रा. उजनी कॉलनी, श्रीपुर ता. माळशिरस याचे जरकीन मध्ये गुन्हयातील गेला माल ३,३१,०२६/- रू. चे एक ४४. ६६० ग्रॅम वजनाचे फिर्यादीचे सोन्याचे मोठे गंठण काळे मनी व सोन्याच्या वाटी, अर्धी अंबारी कंपनीची लाल चटणीची पुडी मिळुन आली. आरोपी नामे २) महादेव शंकर पवार रा. श्रीपुर ता. माळशिरस जि.सोलापूर यांनी गुन्हा करताना वापरलेली होन्डा कंपनीची युनीकॉर्न मॉडेलची बिना नंबर असलेली मोटार सायकल असा मुद्देमाल त्यांचेकडे मिळाल्याने तो गुन्हयाचे तपासात जप्त केला असून त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत ४ गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने त्या ४ गुन्हयांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

१) गुरनं ४१८ / २०२४ भा.द.वि.स. ३९२, ३४ प्रमाणे, २) गुरनं १८/२०२४ भा.द.वि. सं. ३९२, ३४ प्रमाणे, ३) गुरनं ८६४ / २०२२ भा.द.वि.सं. कलम ३९२, ३४ प्रमाणे वरील दाखल असलेल्या गुन्हयाची कबुली दिली. सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशिष कांबळे, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ नागनाथ कदम, पोह १०६३ बिपीनचंद्र ढेरे, पोह ३९६ सुरज हेंबाडे, पोह ४१९ शरद कदम, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह ६०१ नितीन पलुसकर, पोह१७८९ सचिन हेंबाडे, पोह ४९३ नवनाथ माने, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पोकॉ १५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ १९०४ निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीणचे पोशि योगेश नरळे यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here