सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : नागरिकांची सुरक्षितता व आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आज रोजी सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत चिनावल येथे पोर्टेबल पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले.
पोर्टेबल पोलीस चौकीचे उद्घाटन समारंभाला आमदार शिरीषदादा चौधरी हे अध्यक्ष म्हणून तर उद्घाटक म्हणून महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज यांची उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते पोर्टेबल पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले.
या समारंभाला गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.








