आदिवासी शेतकरी रज्जाक तडवी यांना वसंतराव नाईक आदर्श शेतकरी पुरस्कार

rajjak-tadvi-recived-krushi-prize

सावदा (प्रतिनिधी वार्ताहर अज़हर खान) : चोपडा तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच तथा शेतकरी रज्जाक तडवी व यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती फुदाबाई तडवी यांनी त्यांची वडिलोपार्जित शेतीत गेल्या ३० वर्षांपासून सह कुटुंब रात्रंदिवस मेहनत घेऊन विविध प्रकारचे पिकांची लागवड करीत असून उत्पन्न घेत होते व आहे.

 

या पुरस्कार प्राप्त दाम्पत्या अशिक्षित असलेतरी त्यांनी आपल्या ४ मुलांना चांगले शिक्षण दिल्याने त्यांचा मुलगा रशीद रज्जाक तडवी हे सध्या रावेर तालुक्यातील सावदा येथे तलाठी,असून दुसरा मुलगा मजीद रज्जाक तडवी हे चोपडा येथे पोस्ट कार्यालयात पोस्ट सहाय्यक आहे.तसेच आरीफ तडवी व सईद तडवी हे देखील पदवीधर असून शेती करतात या आदिवासी कुटुंबाकडे शेतीसह अनेक गायी म्हशी जनावरे असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून उत्पन्न मिळवतात तसे शेतीत बाहेरून खत ऐवजी स्वत:चे पालतू जनावरांपासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणारा खत शेतामध्ये वापरता.शेतीसाठी मजूर न लावता हे संपूर्ण आदिवासी कुटुंब स्वत:मेहनत करतात तरी याची दखल घेऊन थेट आदिवासी शेतकरी रज्जाक तडवी व त्यांची पत्नी फुंदाबाई तडवी यांना नुकतेच महाराष्ट्र राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या “वसंतराव नाईक आदर्श शेतकरी पुरस्काराने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी सन्मानित केले.

 

तरी प्रथमच मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित कृषी शेतकरी व अधिकारी सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ २०२४ यात धानोरा गावातील आदिवास समाजातील शेतकरी रज्जाक तडवी व पत्नी फुंदाबाई तडवी यांना राज्य शासनाचा शासकीय पुरस्कार मिळाला असून धानोरा गावांसाठी ही बाब अभिमानाची असून गावात व समाजात हे पुरस्कार स्वरुपी सन्मान पहिल्यांदा एका आदिवासी परिवारास मिळाल्याने गावकरी नातेवाईक,मित्रपरिवार व आदिवासी समाजामध्ये आनंदाची लाट उसळलेली आहे. सर्व स्तरातून सदर पुरस्कार प्राप्त शेतकरी रज्जाक तडवी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here