पुणे (उपसंपादक मीराताई आरेकर) : गुडविल फाउंडेशन या समाजिक संस्थेचा उदघाट्न व नवीन वास्तू स्थलांतर याचा कार्यक्रम दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सर्वे न २८ कूपर हौसिंग सोसायटी १३ A, निगडी प्राधिकरण पुणे येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी उदघाटक सत्कार मूर्ती सौ मीराताई आरेकर अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ , उपसंपादक बुलंद पोलीस टाइम्स यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात सुनील पाटील संपादक बुलंद पोलीस टाइम्स, ॲडवोकेट पठाण, कुमारी आशाताई अहिरे, उपाध्यक्ष पत्रकार अससोसिएशन, सौ. वृषाली अध्यक्ष विदर्भ पत्रकार अससोसिएशन, फ्रॅंक नॉर्मन -जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू, गुडविल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ.प्रतीक्षा देशपांडे, खजिनदार प्रवीण देशपांडे, ट्रस्टी -अमोल देशपांडे व अनेक सअमाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ.मीराताई आरेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व उदघाट्न करण्यात आले. गुडविल फॉउंडेशन ही समाजिक संस्था वर्ष 2013 पासून समाजिक क्षेत्रात दिव्यांग आणि अंध अपंग यांच्या हितासाठी काम करत आहे. ही संस्था दिव्यांग मुलं व मुलीचे शिक्षण आरोग्य आणि रोजगार या तीन बाबी वर काम करत आहे. संस्थेमार्फत आज पर्यंत ३७ मुलामुलीचे सामुदायिक विवाह पार पडले आहेत.
या फाऊंडेशनला सौ. मीरा आरेकर या गेल्या ११ वर्षां पासून वेळोवेळी अन्न वस्तू, रोजगार व यंत्र सामग्री चा पुरवठा संस्थेसाठी मोफत करत आहेत. त्यांच्या पाठबळाने संस्थेचे कामकाज उत्तम रित्या चालत आहे. सर्व उपस्थित पाहुण्यांनी गुडविलं फॉउंडेशन च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन समीर शेख यांनी केले.







