जळगांव शहरात प्रथमच रणरागिणी शस्त्रपुजन उत्साहात संपन्न

ranragini-shstrapujan

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम

जळगांव (प्रतिनिधी निलेश पाटील) : महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्याला शाळकरी मुलीही अपवाद राहिलेल्या नाहीत या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे व हिंदु जनजागृती समिती चे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांच्या संकल्पनेतून महिलावर्गास बळ देण्यासाठी व त्यांना स्व-संरक्षण करता यावे यासाठी विजयादशमी निमित्ताने यंदा प्रथमच जळगांव शहरात रणरागिणी शस्र पुजनाचा कार्यक्रम शहरातील नवीपेठ येथे जयप्रकाश नारायण चौकात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जळगांव शहराच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, माजी महापौर सीमाताई भोळे, डॉ. केटकीताई पाटील, तसेच सरकारी वकील अनुराधा पाटील हिंदु जनजागृती समितीच्या कु.सायली पाटील, सौ. सुमित्रा पटेल, विधिज्ञ अनुराधा वाणी या प्रमुख रणरागिनींनी शस्त्र पूजन करून उपस्थितांना संबोधित केले.

या कार्यक्रमाचा मूळ उद्देश महिलांना हिम्मत देऊन त्यांना स्व-संरक्षणासाठी प्रेरित करणे, त्या दुर्गेचे रूप आहेत आणि देवीच्या हातात दांडिया नसून शस्त्र आहे याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी समितीच्या सौ. पूनम पाटील, कु. धनश्री दहिवदकर, कु. वैष्णवी बारी यांनी दंडसाखळी, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, कराटे यासारखे स्व-संरक्षण करणारे प्रात्यक्षिक सादर केले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या कु. दिव्या पाटील यांनी केले तर रणरागिणी शाखेच्या कु. सायली पाटील, धनश्री दहिवदकर, निकिता सोनार, कोमल सोनार, वैष्णवी बारी या रणरागिनींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे समन्वयक सूरज दायमा, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, सुजय चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे गजानन तांबट, निरंजन चौधरी, निखिल कदम, सागर आवटे, जितेंद्र चौधरी, आशिष गांगवे इत्यादींचे सहकार्य लाभले. हा उपक्रम यापुढे दरवर्षी आयोजित करण्यात येईल असे आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here