दसऱ्याच्या मुहूर्तावर सावदा पोलीस स्टेशनच्या बसस्टॉप पोलीस चौकीचे उद्‌घाटन

savada-police

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : आगामी काळात सावदा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता बसस्टॉप भागात पोलीस चौकीची मागणी होती. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर ती मागणी पूर्ण करत सावदा पोलीस ठाणे अंतर्गत बस स्टॉप पोलीस चौकीचे उद्‌घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

उद्‌घाटन समारंभाला पोलीस अधीक्षक जळगाव डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक जळगांव अशोक नखाते, सहायक पोलीस अधिक्षक फैजपूर उपविभाग अन्नपूर्णा सिंग, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमास सावदा शहरातील सन्माननीय नागरीक, पत्रकार व सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पो. उप निरीक्षक अमोल गर्जे, राहुल सानप व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here