धरणगाव तालुक्याचे गट विकास अधिकाऱ्यांचा सत्कार

dharangaon

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर सुभाष पाटील) : धरणगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.वानखेडे यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे सत्कार करण्यात आला तसेच वानखेडे साहेबांनी सांगितले की तुमच्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचे प्रयत्न करेन तसेच तुम्ही धरणगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग नोंदणी झाली पाहिजे तसेच प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.

 

पंचायत समिती व जिल्हा परिषद ५% निधी आपण खर्च करू पंचायत समितीच्या योजना आपण राबवू तसेच तुमचे सहकार्य मला अपेक्षित आहे. तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी सुद्धा सांगितले, साहेब आमचे सुद्धा सहकार्य राहील. धरणगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये ५% निधी वाटप झालेला नाही दिव्यांगांचे घरकुल विषयी सांगितले.

ग्रामपंचायत मध्ये आम्ही ५% निधी मधून घरपट्टी व पानपट्टीमध्ये ५०% सूट देण्यात येते वानखेडे साहेबांनी असे सांगितले की तुमच्या काही समस्या असतील तर मला एक निवेदन देऊन टाका कारण आम्ही मीटिंगमध्ये त्या मुद्द्यावर बोलता येते. तसेच सत्कार प्रसंगी तालुका अध्यक्ष संजय पाटील , राजू चौधरी, रवींद्र काबरे ,रमेश नाना चौधरी, सोनाली व भारती , मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here