वराड खुर्द येथील रेशन स्वस्त धान्य दुकानाला धान्यकिटचा अपुरा पुरवठा

varad-reshan-shop

वराड (क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) : धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द येथील रेशन स्वस्त धान्य दुकानात १८४ रेशन कार्डधारक असतांनाही शासनाकडून फक्त १७६ कार्डाचे धान्य चे किट देण्यात येत आहे.

 

याबाबत माहिती मिळाल्यानंतर वराड खुर्द गावाचे सरपंच अशोक डोंगर भिल, उपसरपंच सचिन रमेश पाटिल, ग्रामपंचायत सदस्य विनोद विठ्ठल पाटिल, अशोक दौलत पाटील, वराड खुर्द चे पोलीस पाटील पुनम संजय सिरसाठ तसेच ग्रामसेवक योगेश गवळे तसेच रेशन स्वस्त धान्य दुकानदार लताबाई दिलीप पाटील हे सर्वजण रेशन दुकानात धान्याचे किट मोजण्यासाठी उपस्थित होते.

 

आता गावाचे लोकांचा मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की आता शासनाकडून रेशनधारकाना धान्याचे किट ८ धारकांना का कमी दिली असेल आणि आता गावातले लोकांचा मनात आणि रेशन दुकानदाराचा मनात प्रश्न निर्माण झाला आहे की कोण किट कमी घेईल, असा प्रश्न गावात निर्माण झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here