पन्हाळा (रिपोर्टर अनिल सांगळे) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरवर दसरा हा सण हा मोठ्या उत्सवात साजरा केला जातो , गेली चार महिने बंद असलेला श्रींच्या पालखी सोहळ्याला खंडेनवमी दिवशी सकाळी आठ वाजता श्रींचे मुख्य पुजारी,उंट घोडे,वाजंत्री,देव सेवकांच्यासह,भाविक भक्त,व गावातील नागरिकांसह श्रींची पालखी मंदिर प्रदक्षणेसाठी बाहेर पडली.
या वेळी पोलीस बँड ,ढोल ताशा पथक यांच्यामुळे मंदिर परिसर दुमदुमून निघाला,सकाळी 10 वाजता धूप आरती सोहळ्याने ,जोतिबा ,यमाई,तुकाई,भावकाई ,मंदिरातील घट उठवण्याचा विधी पार पडला,धूप आरती मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, दुपारी 1:30 वाजता तोफेच्या सलामिने धूप आरती सोहळ्याची सांगता झाली.
त्यानंतर अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली,विजया दशमी निमित्य श्री जोतिबा देवांची आंबारीमधील आकर्षक महापूजा बांधण्यात आली,सायंकाळी ५.३० वाजता पालखी सीमोल्लंघनासाठी दक्षिण महाद्वार कडे रवाना झाली तिथे धार्मिक विधी व सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.







