फरार असलेला दुचाकी चोरटा चोरीच्या दोन दुचाकींसह एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

jalgaon-midc-police

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ५ वर्षांपासून फरार असलेल्या जीवन गोकुळ शिंदे (रा. कठोरा ता.जळगाव) या संशयित आरोपीला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकीही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

एमआयडीसी पोलीसानी पाच वर्षांपासून चोरीस गेलेल्या मोटरसायकलचे दोन गुन्हे उघडकीस आणले आले आहे. सन २०१८ साली प्रशांत सानप रा. शनीपेठ जळगाव यांची सीडी डीलक्स मोटर सायकल क्रमांक एमएच १९ बीई ६२३० ही आव्हाणे शिवारातून चोरीला गेली होती. या बाबतीत जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, कठोरा येथील राहणारा जीवन गोकुळ शिंदे याच्याकडे चोरीच्या दोन मोटार सायकली आहेत.

 

या बातमीवरुन कठोरा येथून जीवन शिंदे यास ताब्यात घेवून त्याचेकडे असलेल्या दोन्ही मोटार सायकलींबाबत विचारपुस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने दोन्ही मोटार सायकलींची माहीती काढली असता सीडी डीलक्स मोटर सायकल क्रमांक एमएच १९ बीई ६२३० ही प्रशांत सानप रा. शनीपेठ जळगाव यांच्या मालकीची दिसून आली आणि अजून एक सीडी डीलक्स मोटर सायकल क्रमांक एमएच १२ जीएच ०८९७ ही मोटर सायकल ही सुरेश वासुदेव इंगळे रा दशरथनगर विश्रांतवाडी पुणे यांच्या नावावर असल्याची माहीती मिळून आलेली आहे.

 

सदर मोटार सायकलींबाबत जळगाव तालुका पोलिस स्टेशनला एक गुन्हा व एक पुणे येथे दाखल आहे. आरोपी जीवन गोकुळ शिंदे यास जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात मोटार सायकलींसह देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका, गणेश शिरसाळे, जमीर शेख, किशोर पाटील, पोका नाना तायडे, गणेश ठाकरे, नितीन ठाकरे, किरण पाटील विकास सातदीवे, योगेश बारी यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here