खडी मशीन चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद

midc-police

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातून गोलू बाबूलाल राजपूत या संशयीताला खडी तयार करण्याची मशीन तसेच प्रिंटर मशीनची चोरी केल्याप्रकरणी जेरबंद केले आहे..

एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामकृष्ण पाटील, योगेश घुगे, ललित नारखेडे आदींच्या पथकाने मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील आरोपीच्या गावापासून सुमारे ५० किलोमीटर लांब असलेल्या रामपूर येथून त्यास अटक केली.

न्या.जे.एस.मोरे यांच्या न्यायालयात संशयीताला हजर केले असता त्यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपीकडून गुन्हयात चोरी झालेली मशीन व प्रिंटर असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गोलू राजपूत याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here