शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर : साक्री गटशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

bribe
FILE PHOTO

धुळे (प्रतिनिधी) : साक्री पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा धुळ्यातील प्राथमिक माध्यमिक विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक महेंद्र गोपाळराव सोनवणे (५८, रा. प्लॉट. नं.२७, अनमोल नगर, राजीव गांधी शाळेजवळ, वाडीभोकर रोड, धुळे) यांना धुळे एसीबीने दोन लाखांची मागणी केल्याप्रकरणी बुधवारी दुपारी अटक केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी २० ऑगस्ट रोजी धुळे वेतन अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी यांनादेखील दोन लाखांची लाच घेताना धुळे एसीबीने अटक केली होती.

 

लाचखोर सोनवणे हे गुरुवार, ३१ ऑक्टोंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर एसीबीने कारवाई केल्यानंतर शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली. ३० वर्षीय तक्रारदार यांचे ओम साई इंटरप्राइझेस या नावाने पिंपळनेर, ता.साक्री, जि.धुळे येथे दुकान आहे. या फर्ममार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत बूट व पायमोजे पुरवठा साक्री तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना केला होता व ४० लाखांच्या वस्तू पुरवठ्यापोटी अनुदान मागणीच्या फाईल जमा करून तक्रारदार यांनी पुरवठा केलेल्या वस्तुंचे बिल अदा करण्यासाठी एकूण बिलाच्या रकमेवर पाच टक्केप्रमाणे दोन लाखांची लाच ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी महेंद्र सोनवणे यांनी मागितल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली होती मात्र लाचेचा संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र अहवाल येताच बुधवारी त्यांना अटक करण्यात आली.

 

धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजन कदम, पावरा आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here