मुक्ताईनगरात अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचे शक्ती प्रदर्शन; आज भरला विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज

rohini-khadse

सावदा (जिल्हा क्राइम रिपोर्टर अजहर खान) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत तहसील कार्यलयात आपला उमेवारी दाखल केला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्षातील आमदार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर येथील नवीन मुक्ताबाई मंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताबाईची विधीवत पूजा करीत दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नागेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले.

 

जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळे मी भरघोस मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला. त्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात उमेवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, . जनता मला मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याची संधी देईल.

ॲड.रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही सर्व नष्ठेने व प्रामाणिकपणे रोहिणी खडसे यांच्या मागे उभे आहोत. यापुढेही उभे राहू. आम्हाला विश्वास आहे की, रोहिणी खडसे ह्या प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र भैय्या पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रोहिणी खडसे ह्या प्रचंड मतांनी निवडून येतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी रावेर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र भैय्या पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here