श्रीनगर (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्य दलाच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री बारामुल्लाच्या बुटापाथरी परिसरात हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय सैन्य दलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. तर दोन हमाल या हल्ल्यात मृत झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे जवान जखमी झाले आहे. याबाबतची माहिती भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली आहे.
गस्तीवर असलेल्या भारतीय सैन्य दल जवानांच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री बुटापाथरी परिसरात भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय सैन्य दलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं. यावेळी वाहनात असलेल्या दोन हमालांनाही आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर सैन्य दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची शक्यता सैन्य दलाच्या जवानांनी वर्तवली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
#UPDATE | Two Indian Army soldiers and two civilian porters killed in the terrorist attack on a military vehicle in Baramulla. One soldier and one porter are injured and undergoing treatment: Indian Army officials https://t.co/EC6qVyR8SC
— ANI (@ANI) October 25, 2024
दहशतवाद्यांनी बारामुल्लातील बुटापाथरी परिसरात भारतीय सुरक्षा दलाच्या वाहनांवर केलेल्या भीषण हल्ल्यात दोन जवानांना वीरमरण आलं. यावेळी दोन हमालांचा मृत्यू झाला. या घटनेत एक सुरक्षा दलाचा जवान आणि एक हमाल जखमी झाला आहे. या जखमींवर सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती भारतीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.







