जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आज देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. काल म्हणजेच वसुबारसपासून दिवाळीची सुरूवात झाल्याचे मानले जाते. धनत्रयोदशी हा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आज (दि.२९) धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी भंगाळे गोल्डमध्ये ग्राहकांनी अलोट गर्दी केली होती.
विविधता, शुध्दता आणि पारदर्शक व्यवहार या त्रिसूत्रीवर शहरात नाव कमावलेल्या भंगाळे गोल्डतर्फे दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २२ कॅरेट सोने दागिन्यांच्या मजूरीवर ५० टक्के सूट देण्यात येत आहे. याशिवाय सर्व प्रकारचे ॲटीक व कुंदन ज्वेलरी भंगाळे गोल्डमध्ये उपलब्ध आहे. यासह सोन्याचे सर्वात योग्य दर, सर्व दागिने १०० टक्के हॉलमार्क, सोने बदलात शून्य वजावट आदी फायदेही देण्यात येत आहेत.
सातत्याने ग्राहकांना नावीन्यपूर्ण देणाऱ्या भंगाळे गोल्डने झार या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ब्रॅण्डचे दागिनेही उपलब्ध करून दिले आहे. तरी ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल संचालक भागवत भंगाळे, आकाश भंगाळे, सागर भंगाळे यांनी ग्राहकांचे आभार मानले आहे.







