मुक्ताईनगरात कारमध्ये सापडली चार लाखांची कॅश

currency-note
प्रतीकात्मक छायाचित्र

सावदा (जिल्हा क्राइम रिपोर्टर अजहर खान) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत एसएससी पॉईंट मुक्ताईनगर तहसीलच्या अंतर्गत नाकाबंदीत संशयित वाहन तपासणीत ४ लाख १० लाखाची रक्कम आढळून आली.

मुक्ताईनगर पोलीस ठाणे हददीत विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रस्त्यावर एस.एस. टी पॉईंट भोटा फाटा येथे नाकाबंदी चालु असताना नाकाबंदी कामी कार्यरत असलेले उमेश मुरलीधर पाटील, वरीष्ठ सहायक पंचायत समिती मुक्ताईनगर, पो. ह. तडवी, पो.शि. पवार यांनी सौरव पाटील जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभाग व त्यांचेसोबत असलेले पथकाचे मदतीने ब-हाणपुर कडुन मुक्ताईनगरकडे जाणारी संशयित मोटर कार (क्रमांक एमपी. ६८ सी २३७८) हे वाहन थांबवले असता त्यात मगन केतन जांभळकर रा. लालबाग कोयला गेट समोर, बऱ्हाणपर (मध्यप्रदेश) व जयेश पंडीत चौधरी रा. आडगाव जि. बऱ्हाणपुर (मध्यप्रदेश) हे दोन व्यक्ती होते.

 

त्यात रक्कम ४ लाख १० हजार रुपये आढळले. या रकमेबाबत कार मधील इसमांना समाधानकारक कागदपत्रे सादर करता न आल्याने पो.ह. तडवी यांनी दोन पंचासमक्ष रक्कम एस. एस. टी. पथकातील महसुल विभागाचे उमेश पाटील यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here