वानवडी पोलिसांनी चोरीचे ४५ मोबाईल हस्तगत करुन दिले परत

wanvadi-police

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमिला टेमगिरे) : वानवडी पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रवासा दरम्यान व विविध ठिकाणाहून मोबाईल हरवल्याच्या तक्रारीमधील सव्वा सहा लाख रुपयांचे ४५ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल तक्रारदार नागरिकांना परत करण्यात आले. दिवाळीमध्ये मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.

 

मोबाईल हरविल्यानंतर त्याची तक्रार पुणे पोलीस वेबसाईटवरील लॉस्ट अँड फाऊंटवर तसेच शासनाच्या सीईआयआर या पोर्टलवर तात्काळ नोंद करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, पोलीस हवालदार अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, आनंद दरेकर, महेश गाढवे, दया शेगर, हरी कदम, सर्फराज देशमुख, संदिप साळवे, सोमा कांबळे, गोपाळ मदने, यतिन भोसले, विष्णु सुतार, अमोल गायकवाड, सुजाता फुलसुंदर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here