सावदा (क्राइम रिपोर्टर अजहर खान) : भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. नागरिकांच्या संरक्षणासोबत सामाजिक बांधीलकी जोपासत सावदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
दिवाळी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. पण समाजात काही कुटुंब अशी आहेत कि ते केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे सण साजरा करू शकत नाहीत. त्यांच्या घरात सणादिवशी चूल देखील पेटत नाही.
ही गोष्ट लक्षात घेत सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या उपस्थितीत सावदा पोलिस हद्दीतील आदिवासी बांधवांना सावदा पोलीस स्टेशन तर्फे दिवाळीचा फराळ,मिठाई व फटाके वाटप करण्यात आले.यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी उपस्थित होते.







