पुणे (जिल्हा प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सेवानिवृत्ती सोहळा व निरोप समारंभ दि. ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयात आयोजित समारंभात पोलीस उपनिरीक्षक अनिल तुकाराम भोसले, रमेश भगवान भिसे व पोलीस हवालदार मोहनकुमार भगवान जाधव यांना व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस सहआयुक्त डॉ.शशिकांत महावरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह, झाडाचे रोपटे, साडी देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या भावी आयुष्याकरिता व आरोग्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) विवेक पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ विशाल गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त प्रशासन भास्कर डेरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक उपस्थित होते.







