धरणगाव (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर संजय विसपुते) : तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील अयोध्या नगरातील रहिवासी देवसिंग पावरा यांच्या घराला दुपारी २ वाजेच्या सुमारास ऐन दिवाळीच्या दिवशी अचानक आग लागल्यामुळे संपूर्ण घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच १५ ते २० क्विंटल कापूस जळून खाक झालेला आहे
दुपारी दोन वाजता घरातील कुटुंब शेतात गेले असतांना घराला अचानक आग लागली त्यात १५ ते २० क्विंटल कापूस तसेच घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालेले आहे. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालेले होते.
गरीब कुटुंब पोट भरण्यासाठी मध्यप्रदेशातून पिंपरी येथे आलेले होते व दुसऱ्याची शेत जमीन उक्त्याने केलेली होती तरी ते कुटुंब आजच उघड्यावर आलेले आहे त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांनी भेट देऊन धरणगाव तहसीलदार यांना तात्काळ मदत करण्याविषयी सूचना दिल्या.







