कारमध्ये गॅस भरताना झालेल्या भीषण स्फोटात ओमिनी जळून खाक; ४ गंभीर

burning-car

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : वाहनात गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट होऊन ओमिनी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गॅस भरणारे ३ जण आणि गाडीमालक असे चार जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत.

 

विशेष म्हणजे बेकायदेशीररित्या तसेच अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरला जात होता, त्यातूनच ही गंभीर घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दुर्घटनेतील जखमींना रग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ओमनी गाडीने पेट घेतला त्यानंतर भीषण आग लागली. त्यात गॅस भरणाऱ्याचे दुकान तसेच एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीच्या दुर्घटनेत भाजलेल्या चारही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. याबाबत घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी पोहचून आग विझवण्यात यश मिळवलं. मात्र, तोपर्यंत संपूर्ण ओमिनी कार आणि दूचाकी, व दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here