जिल्ह्यातील ४९ उमेदवारांना निवडणूक काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा

bodygaurd

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : विधानसभा निवडणुकीत निवडणूक लदविणाऱ्या जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांना निवडणूक काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा पुरविली जाणार आहे. जिल्हास्तरीय समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

सद्यस्थितीत निवडणुकीत उमेदवारांबाबत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीविताला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून त्यांना एक शस्त्रधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांना आज (दि.६) अशा प्रकारची सुरक्षा पुरविली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. तसेच ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असल्याचेही डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

 

जिल्ह्यातील चोपडा – प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रभाकर सोनवणे, रावेर – अमोल जावले, धनंजय चौधरी, अनिल चौधरी, दारा मोहम्मद, भुसावळ – डॉ. राजेश मानवतकर, जळगाव शहर – डॉ. अनुज पाटील, जयश्री महाजन, शैलजा सुरवाडे, राजूमामा भोळे, कुलभूषण पाटील, जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर, मुकुंदा रोटे, अमळनेर – शिरीष हिरालाल चौधरी, डॉ. अनिल शिंदे, एरंडोल – डॉ. सतीश पाटील, अमोल चिमणराव पाटील, ए.टी. पाटील, चाळीसगाव – उन्मेश पाटील, मंगेश चव्हाण, पाचोरा – वैशाली सूर्यवंशी, सतीश बिऱ्हाडे, अमीत तडवी, प्रताप हरी पाटील, मागो पगारे, अमोल शिंदे, अमोल शांताराम शिंदे, निळकंठ पाटील, मनोहर ससाणे, दिलीप वाघ, वैशाली किरण सूर्यवंशी, जामनेर – दिलीप खोडपे, मुक्ताईनगर – अनिल मोरे, अनिल गंगतीरे, अॅड. रोहिणी एकनाथ खडसे, अशोक जाधव, संजय ब्राम्हणे, अर्जुन पाटील, ईश्वर सपकाळे, उमाकांत मराठे, रोहीणी कवडे, रोहिणी खडसे, रोहिणीताई खडसे, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटील, जफर अली मकसूद अली, विनोद सोनवणे आणि सुरेश तायडे यांना सुरक्षा पुरविली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here