जळगाव (संपादक सुनिल पाटील) : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
आ. एकनाथराव खडसे साहेबांनी ३० वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना रस्ते, शिक्षण, सिंचन, आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला. आपल्या ऐनपूर गावात सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे झाली. त्यांना या कार्यासाठी सदोदित तुमची साथ लाभली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. मागील निवडणुकीत जशी तुमची साथ लाभली, तशीच साथ कायम ठेवून मतदार रूपी आशीर्वाद देऊन आपल्या सेवेची संधी देण्याची त्यांनी ग्रामस्थांना विनंती केली.
“तुम्ही दिलेल्या संधीचे सोने करून,आ. एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अरुण दादा पाटील, राजाराम भाऊ महाजन,आणि सर्व जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी मी सदैव प्रयत्नरत राहीन,” असा विश्वास ग्रामस्थांना दिला. ग्रामस्थांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहता, २३ नोव्हेंबरला तुतारीच्या विजयाची ललकारी घुमेल, याची खात्री पटली आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, शिवसेना (उबाठा) तालुका अध्यक्ष अविनाश पाटील, तालुका अध्यक्ष किशोर पाटील, माजी प स सदस्य दीपक पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, पवनराजे पाटील, सचिन महाले, सुनील कोंडे, मंदार पाटील, पवन चौधरी, अमोल महाजन, शशांक पाटील, किशोर पाटील, रविंद्र महाजन, श्रीकांत चौधरी, भागवत कोळी, अरविंद पाटील, मधुकर पाटील, शाहिद खान, सारंग पाटील, सुमित सावरने, मनोज गोसावी, सलमान खान, मेहमूद शेख, हैदर अली, नितीन पाटील, दीपक पाटील सर, केतन पाटील, उज्वल पाटील, सोनू पाटील, संजय पाटील, परेश गोसावी, रविंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, मधुकर पाटील, अर्चना पाटील, चेतन पाटील, भूषण पाटील, गणेश देवगिरीकर, रोहन चराटे, सागर मराठे, सरपंच अमोल प्रभाकर पाटील, काशिनाथ श्यामू पाटील, भगवान फकीरा महाजन, रघुनाथ माधव पाटील, रमेश रघुनाथ पाटील, रमेश जीवराम महाजन, किशोर भगवान पाटील, अनिल आसेकर, अक्षय श्रीराम महाजन, प्रथमेश पाटील, अरविंद महाजन, मोहन कचरे, पवन कपले, गणेश बाविस्कर, अतुल जैतकर, प्रवीण जैतकर, अर्चनाताई पाटील आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.







