यावल शहराच्या रखडलेल्या विकास प्रश्नांचे निराकरण करुन सर्वांगिण विकास करणार – धनंजय चौधरी

dhanjay-chaudhari

यावल (प्रतिनिधी अजहर खान) : विरार नगर येथील श्री गजानन महाराज मंदिर येथून विधानसभा निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय शिरीष चौधरी यांनी यावल शहरात प्रचाराचा शुभारंभ केला.

 

यावेळी त्यांच्यासोबत यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य शेखरदादा पाटील माजी नगराध्यक्ष अतुलदादा पाटील शरदकाका कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले सर,शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे,शहराध्यक्ष जगदीशकाका कवडीवाले काँग्रेस शहराध्यक्ष कदिर खान माजी प्र.नगराध्यक्ष राकेशदादा कोलते राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्सार खान व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिक, व्यापारी, कष्टकरी, शेतकरी, महिला आणि तरुणांशी संवाद साधला.

 

यावल शहराच्या रखडलेल्या विकास प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी “हाताचा पंजा” या चिन्हासमोरील बटण दाबून आपले मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंती केली.

याप्रसंगी नागरिकांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लढण्यासाठी बळ आणि प्रेरणा देणारा होता.यावेळी अमोलदादा भिरुड, सारंगदादा बेहडे, माजी नगरसेवक रसूल शेठ, असलम मेम्बरं, समीर मेम्बरं, अनिल जंजाळे, डॉ विवेक अडकमोल, संतोष खर्चे, पप्पू जोशी, भैय्या साहेब सपकाळे, पराग देशमुख, बोडदे नाना, ह.भ.प.पुंडलिक महाराज, इमरान पहेलवान, अमर कोळी, उमेश जावळे, अजय बढे, अजहर खाटीक, भास्कर धोबी, योगेश महाजन, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पवन पाटील, विक्कीभाऊ गजरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here