पाच वर्षात गावागावात वाढलेल्या अवैध धंद्याना आळा घालणार – रोहिणी खडसे

रोहिणी खडसे

सावदा (क्राइम रिपोर्टर अजहर खान) : आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून गावागावात सभागृह, अंतर्गत रस्ते, शिक्षण,आरोग्य, पाणी पुरवठा अशा मुलभूत सुविधांचे निर्माण करण्यात आले. एकनाथराव खडसे यांनी गेल्या तीस वर्षात जातीपाती विरहित सर्वसमावेशक राजकारण करत, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला परंतु गेल्या पाच वर्षात गावागावात अवैध धंदे बोकाळले आहेत. या अवैध धंद्यांना आळा घालण्याचे काम निवडणुकीनंतर सर्वात आधी हाती घेणार आहे. महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या मतदार संवाद दौऱ्यात ठिकठिकाणी त्या ग्रामस्थांशी संवाद साधत होत्या.

 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावोगावी महिला माझ्याजवळ येऊन गेल्या पाच वर्षात गावात अवैध नकली दारू विक्री वाढली असल्याची त्यातून अनेकांचे संसार उध्वस्त होत असून दारू विक्री बंद करण्याची मागणी करत आहेत. अवैध दारू विक्रीतून जीवितहानी घडल्याच्या मतदासंघांत घटना घडल्या असून या दारू विक्रीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

यावेळी माजी पं स सदस्य दिपक पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष किशोर पाटिल,शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख अविनाश पाटील, सौ.शारदाताई खडसे चौधरी, मनोज खैरनार, मधुकर पाटील, नितीन पाटील, श्रीकांत चौधरी,शशांक पाटील, रविंद्र महाजन,सचिन महाले, राहुल फेगडे, शांताराम पाटील, दुष्यांत पाटील, ललित पाटिल, बंटी चौधरी, पांडुरंग झांबरे, भागवत कोळी,गजानन कांडेले, जयवंत राजपूत, रविंद्र पाटील,गणेश देवगिरीकर,गफ्फुर कोळी,कमलेश भारंबे,संतोष वाघ,चेतन पाटील,आकाश पाटील,रोहन चऱ्हाटे , चेतन पाटील, संजय पाटील, केतन पाटील, भागवत कोळी, अश्विन तायडे, सिद्धार्थ तायडे, संजय पाटील, गुणवंत पाटील, प्रकाश पाटील, भूषण कोळी, नितीन पाटील, आकाश पाटील, राजू कोळी, ब्रिजलाल कोळी, राहुल चौधरी, समाधान कोळी, विजय पाटील, ईश्वर चौधरी, हर्षल पाटील,भगवान सावळे, गोकुळ कोळी आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here