बुधवार पेठेत भरोसा सेलची कारवाई; पाच मुलींची सुटका : चौघांना घेतले ताब्यात

red-light-area

पुणे (क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) : मुलींना वेश्याव्यवसायात गुंतवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेणार्‍या चौघांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाने बुधवार पेठेतील पाच पीडित मुलींची सुटका केली आहे. त्यानंतर कुंटणखाना मालकिणीसह संबंधितांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष व प्रिडेम फर्म संस्थेला ७ नोव्हेंबरला बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत काही महिलांना देह व्यापारासाठी अडकवून ठेवल्याची माहिती मिळाली. पथकाने वेश्यावस्तीतील कुंटणखान्यातून छापा टाकून कारवाई केली. पाच मुलींची सुटका करत मालकिणीसह इतर तीन आरोपींविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

पोलिसांनी पकडण्यात आलेल्या तरुणीकडे विचारणा केली असता तिची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्याकडून कुंटणखाना मालकीणीने वेश्याव्यवसाय करून घेतला. तर दुसरी तरुणी मुंबई येथे घरकाम करत होती. त्याच्यावर उदरनिर्वाह पूर्ण होत असल्याने दोन महिन्यांपूर्वी ती कामासाठी आली तर तिला आरोपींनी वेश्याव्यवसायास लावले. तिसर्‍या तरुणीने सांगितले ती मूळची जयपूर येथील असून, ती तिचे आई-वडील व दोन मुलांसह घरकाम करून खर्च भागवत होती. तिला जयपूर येथील एका महिलेने एका व्यक्तीचा नंबर दिला. त्यानंतर तिला पुण्यातील बुधवार पेठेत दोन महिन्यांपूर्वी बोलावून घेतले. नंतर तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. चौथ्या महिलेला तिच्या नवर्‍यानेच बुधवार पेठेत आणून कुंटणखाना मालकिणीच्या साथीने तिला वेश्याव्यवसायास भाग पाडले.

 

पाचव्या सुटका केलेल्या तरुणीने सांगितले की, ती मूळची दक्षिण परगना पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. तिच्याकडे चौकशी करता ती आई-वडील व लहान भावासह गावी राहात होती. आई- वडील शेती करतात. सहा वर्षांपूर्वी तिच्या गावात राहणार्‍या एकाबरोबर तिचे लग्न झाले. सात महिन्यांपूर्वी तिचा पती तिला पुण्यातील बुधवार पेठेत घेऊन आला. तेथे त्याने कुंटणखाना मालकिणीशी संगनमत करून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. या पाचही महिलांकडून आरोपींनी वेश्याव्यवसाय करून घेत त्यांना या व्यवसायातून मिळालेले निम्मे पैसे घेतले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, भरोसा सेल पोलिस निरीक्षक संगीता जाधव, सहायक फौजदार राजेंद्र कुमावत, छाया जाधव, रेश्मा कंक, इम्रान खान नदाफ, भुजबळ यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here