जळगाव (संपादक सुनिल पाटील) : धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या प्रचार नियोजन करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नगांव येथे 10 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली.
बैठकीस एसटी विधानसभा प्रभारी डॉ. निशांत खरे, आदिवासी विधानसभा मतदार संघाचे प्रभारी ऍड. किशोर काळकर,भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस जि प मा. अध्यक्ष मनोहर भदाणे , जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील निवडणूक रचनेतील प्रमुख पदाधिकरी उपस्थित होते.







