प्रगतीच्या वाटेवर महिलांचा आशीर्वाद अनुप भैय्यांच्या पाठीशी – चित्राताई वाघ

chitratai-wagh

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : धुळे शहरातील राधाकृष्ण लॉन्स येथे महिला मेळावा पार पडला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थित होती. मेळाव्याच्या सुरुवातीला महिलांनी औक्षण करून सत्कार करण्यात आला.

 

यावेळी बोलतांना चित्राताई वाघ यांनी अनुप भैय्यांच्या योजनांचे कौतुक करत, विरोधकांवर कडक शब्दांत टीका केली.तसेच धुळे शहराला अनुप भैय्यांसारखा नेता का गरजेचा आहे हे सांगताना त्यांच्या समाज उपयोगी योजनांना विरोध करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेत मतदानाला 100 टक्के बाहेर पडून अनुप भैय्यांच्या पाठीशी उभं रहा,” असा संदेश त्यांनी दिला.

 

तसेच ह्या कार्यक्रमाला उपस्थित गुजरातचे आमदार मुकेश पटेल यांनी भारतीय जनता पक्षाने कायमच महिलांचा सन्मान केला आहे आणि आज महिला मेळाव्याच्या निमित्ताने अनुप भैय्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या महिलांचा पाठिंबा यांचा विजय नक्कीच घेऊन येईल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, आमदार मुकेशजी पटेल, मा. खासदार सुभाषजी भामरे, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदिप नाना कर्पे, धुळे शहर महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली ताई शिरसाठ, भारतीताई माळी, प्रभादेवी परदेशी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here