आईसारखं जळगावचा सांभाळ करेल; जयश्री महाजन यांची जळगावकरांना भावनिक साद

जयश्री महाजन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आईला आपल्या घराची काळजी असते, ती थकत नाही, ती कधीच मागे हटत नाही, कारण तिला माहित असतं की तिच्या कष्टांनी तिचं घर सुरक्षित राहील. जळगाव हे घर सांभाळण्याची जबाबदारी मी माझ्या मायेने आणि न थकता पार पाडीन. शहराला घडवण्याचं काम मी एक आई म्हणून करेन, अशी भावनिक साद आज (दि.१२) जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी जळगावकरांशी बोलतांना घातली.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारार्थ आज (दि.१२) दुपारी रामानंद नगर पोलिस स्टेशन परिसरात प्रचार रॅली काढली होती. जयश्री महाजन यांच्या भावनिक बोलण्याने परिसरातील वातावरण अधिकच भावनावेधक बनले. जयश्री महाजन यांच्या बोलण्यातून आणि नागरिकांसोबतच्या संवादातून त्यांचे शहराप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि निस्सीम बांधिलकी दिसून येत असल्याने, जळगावकर नागरिकांच्या मनात आता जयश्री महाजन एक विशेष जागा निर्माण करत आहेत.

 

आज (दि.१२) दुपारी प्रभाग क्रमांक ११ मध्ये प्रचार दौरा केला. यात शकुंतला शाळेसमोरील भाग, शकुंतला आय.टी.आय., चांदणी चौक, आशाबाबा नगर, वर्धमान हाईट, रामानंद नगर पोलीस स्टेशन परिसर आदी ठिकाणी मतदारांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.

या प्रचार फेरी दरम्यान महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. जयश्री महाजन यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक घराजवळ भगिनी मोठ्या उत्साहाने उभ्या होत्या. महिलांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, त्यांचे औक्षण करुन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रचार फेरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदवला. जयश्री महाजन यांच्या भावनिक संवादाने आणि जळगावप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदारीने जनमानसाला एक नवी उभारी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here