जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेना नेते संजय राऊत यांची जाहीर सभा

संजय राऊत

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आपल्या परखड वक्तव्याने सभा गाजविणारे नेते म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांचे नाव प्रसिध्द आहे. नेहमीच वादग्रस्त व परखड शब्दात विरोधकांचा समाचार घेणाऱ्या संजय राऊत यांची सभा जळगाव ग्रामीणचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ दि.१२ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता धरणगावातील शिवसेना कार्यालयाजवळील साने पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.

 

जळगाव ग्रामीणमध्ये दोन्ही गुलाबरावांच्या प्रचाराची रंगत केवळ प्रचारफेऱ्यांपूरती मर्यादित राहीली नसून, आता सभांनी ती चांगलीच गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभेच्या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत काय बोलणार याकडे जळगाव ग्रामीणमधील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

या सभेला महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, समर्थक व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडी जळगाव ग्रामीणतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here