धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : जळगाव ग्रामीण आणि धरणगाव तालुक्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जळगाव ग्रामीणला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरमहा ३ हजार रूपये देण्यात येतील. याशिवाय शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी दिली जाईल. बेरोजगार तरुणांना ४ हजार रूपये भत्ता मिळेल. जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात येईल, असे आश्वासन शरद पवार यांनी धरणगाव येथील सभेच्या ठिकाणी दिले







