मुक्ताईनगर (संपादक सुनिल पाटील) : मुक्ताईनगर मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, पातोंडी, बेलखेड, धामणदे, भोकरी, नरवेल, पिंप्रि भोजना, लोहारखेडा, बेलसवाडी, पिंप्री नांदू या गावांमध्ये जन आशिर्वाद पदयात्रा काढून मतदारांचे आशिर्वाद घेऊन मतदारांशी संवाद साधत त्यांना मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली.
यावेळी किशोर चौधरी यांनी मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून पिंप्री नांदु येथे तापी नदीवर भव्य पुलाचे निर्माण करण्यात आले. त्यामुळे रावेर आणि मुक्ताईनगर तालुका जवळ आला या पुलामुळे नुसते दळणवळणच वाढले नाही तर नातेसंबंध जवळ येऊन वृध्दींगत झाले. व्यापार वाढला त्यामुळे हा पुल परिसराच्या विकासासाठी चालना देणारा ठरला.
आमदार एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघाचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, राजकारण, समाजकारण करताना कधीच कोणतेही जातीभेद केले नाहीत. सौ. सुनिताताई चौधरी यांना पंचायत समिती सभापतीपदाची संधी दिली. गुजर समाजातील अनेक जणांना त्यांनी पक्ष संघटना, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी दिली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रोहिणी खडसे या राजकारण समाजकारण करत असुन त्यांच्याकडे विकासाची दुरदृष्टी आहे मागिल काळात ग्राम समित्या स्थापन नसल्याने शेतकऱ्यांना पोकरा योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यावेळी त्यांनी पंचायत समिति ते मंत्रालया पर्यंत केलेल्या पाठपुराव्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहिणी खडसेंच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला होता अशा शेतकरी कष्टकरी महिला युवकांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन किशोर चौधरी यांनी केले.
यावेळी ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.







