जळगाव (संपादक सुनिल पाटील) – पंकज नाले संस्थापित जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्यातर्फे माजी सैनिक व अमर जवान शहीद तसेच लष्करी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व सर्टिफ़िकेट देऊन सत्कार करण्यात आला. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणाची आहुती देणार्या शहीद जवानच्या पत्नी विजया नेरकर मैडम , श्री सुधाकर सिताराम कोलते , श्री दिपक राव ,श्री मधुकर पाटील , श्री प्रकाश बडगुजर ही सत्कारार्थी ची नावे आहेत. तसेच तालुका पोलीस स्टेशन व रामानंद नगर पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाला कोविड 19 योद्धा चे सन्मानचिन्ह व सर्टिफ़िकेट देण्यात आले. याप्रसंगी साईमत चे प्रमुख परेशदादा बर्हाटे,विश्व हिंदू परिषद बजरंग दल महामंत्री दिपक दाभाडे, जनमत प्रतिष्ठान संचालक पंकज नाले, शिक्षक भरती महिलाध्यक्षा श्रीमती शितलताई जडे,सेवाश्रम फाऊंडेशन संस्थापक विवेक ठाकरे, राहुल लोखंडे ,कुणाल जडे, हर्षाली पाटील ,नगरसेवक विजय पाटील,,प्रविण कोलते, सुखदेव पाटील , पोलीस विभागाचे राजेश पाटील, प्रफ्फ़ुल धांडे, ,ए.पी.आय.राऊत साहेब उपस्थित होते.








