ग्रामपंचायत जोगेश्वरी भ्रष्टाचाराचा विळख्यात; आदर्श गावाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे

वाशिम (विशेष प्रतिनिधी) – ग्रामपंचायत जोगेश्वरी येथील नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत जोगेश्वरी सरपंच बापूसाहेब वाळूकर ,ग्रामसेवक वायाळ यांची तक्रार निवेदनात केली आहे, गावातील दलित ,ओबेसि, गोरगरीब नागरिकांवर केला जातोय अन्याय, शासनाच्या अनेक सुविधांपासून ठेवले जाते वंचित,
ग्रामपंचायत जोगेश्वरी हे गाव आदर्श गाव म्हणून रिसोड तालुक्यांमध्ये निवड करण्यात आले होते आदर्शगाव म्हटल्यानंतर गावामध्ये नागरिकांसाठी शासनाने दिलेल्या सर्व सुविधा मिळणे गरजेचे असते ग्रामपंचायत गावामध्ये सुशोभीकरण शौचालय स्वच्छता क्रीडांगण गावातील नाल्या व्यवस्थित असणे रस्ते व्यवस्थित असणे गरजेचे आहे त्याचबरोबर गावामध्ये विद्युत पोल वरती सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत परंतु ते निकामी आहेत त्या मुलांचा कनेक्टिविटी तार तुटलेली आहे ग्रामस्थांच्या घर टॅक्स वसुली करून हे कॅमेरे बसवण्यात आले होते कमी दर्जाचे हे कॅमेरे बसून त्याचा पैसा सुद्धा सरपंच व ग्रामसेवक यांनी स्वतःच्या तिजोरीत भरला आहे गावाच्या सुरुवातीला हागणदारीमुक्त गाव जोगेश्वरी असा फलक लावला असून त्या फलकाच्या पाठीमागेच रोडवरती गावातील नागरिक शौचालयात बसतात त्यामुळे दुर्गंध व घाणीचे वातावरण त्यामुळे रोगराई पसरते याकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिले पाहिजे आदर्श गाव जोगेश्वरी येथे सर्व आदर्श गावाच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी सरपंच व ग्रामसेवक यांनी स्वतःच्या तिजोरीत भरून ठेवला आहे गावासाठी कुठलाही निधी खर्च केला जात नाही 14 वा वित्त आयोगाचा मिळालेला निधी हा गेला तरी कुठे असा प्रश्न आमच्या सर्व जोगेश्वरी गावातील नागरिकांना पडला आहे गावातील भुमिन गोरगरीब नागरिकांना रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना शौचालय याचा लाभ मिळत नाही , श्रीमंतांना घरकुल योजनेचा लाभ मिळतो मग गोरगरिबांना त्यापासून वंचित ठेवले जाते शासनाच्या विविध प्रकारच्या सुविधा पासून डावलण्यात येते अश्या प्रकारे आदर्श गाबत भ्रष्टाचार होत आहेत, गावाला आदर्श पुरस्काराने सन्मानित फक्त कागदपत्रे केले आज गावाची पाहणी संबंधित अधिकार्यांनि करायला हवी होती व कोरोणाच्या महामारी मध्ये काम थांबले आहेत असे सांगून सरपंच व ग्रामसेवक टाळाटाळ करत आहे परंतु कोरोना हा रोग चार महिन्यापासून आलेला आहे परंतु सरपंच व ग्रामसेवक हे पूर्वीपासून आहेत गेली कित्येक महिने पासून आम्ही ग्रामसेवक व सरपंच यांना विचारणा केली असता कुठलेही उत्तर दिले जात नाही व शासनाच्या सुविधांपासून आम्हाला वंचित ठेवण्यात येते महाराष्ट्र शासन आदर्श गाव योजना अंतर्गत विविध लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले आहे परंतु हे धनादेश श्रीमंतांनाच वाटप करण्यात आलेला आहे यामध्ये जास्तीत जास्त सहभाग श्रीमंतांचा आहे यामध्ये गोरगरिबांना दोन-तीन ग्रामस्थांना याचा लाभ मिळाला आहे महाराष्ट्र शासन आदर्श गाव योजना अंतर्गत विविध लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात येतो त्यामध्ये खरोखर लाभार्थी आहेत का नाहीत याची सखोल चौकशी झाली पाहिजे ,गावाला रस्ता नाहीये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यावरून जात असताना गाड्या मोठ्या प्रमाणात घरून पडतात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही आदर्श गावाला रस्ताच व्यवस्थित नाहीये तरी ग्रामस्थ सहन करत आहेत याबद्दल जर कोणी आवाज उठवला तर त्याला तिथेच दाबण्याचा प्रयत्न केला जातो आदर्श गावांमध्ये अत्याचार अन्याय सहन करून किती दिवस जगायचे हा विचार आम्हा सर्व नागरिकांना होता त्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री ऋषिकेश मोडक साहेब आपणास तक्रार निवेदन सादर करतो कि आदर्श ग्रामपंचायत जोगेश्वरी या गावाचा कारभार कसा चालतो तो आपण शहानिशा करून चौकशी करावी व सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे अशी मागणी भास्कर प्रकाश कांबळे,शांताराम सखाराम कांबळे,भीमराव वाळूकर,संजय दशरथ वाळूकर ,दत्ता रामभाऊ मोरे प्रदिप मधुकर तनपुरे ,गौतम कुंडलिक कांबळे, चेतन मधुकर कांबळे , संजय अमृता कांबळे, गजानन पांडुरंग कांबळे ,विशाल तेजराव सोनवणे ,गजानन तुकाराम खराटे ,गणेश बंडू खंदारे,व सर्व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना आदर्श गावातील ग्रामपंचायत ची तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here