जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोलिस दल आणि आयटीबीपीच्या जवानांच्या कडून ही नाकाबंदी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
शहरात पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये २० लाख रुपयांची रोकड आढळून आली. सदर रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात चार कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. तसेच अवैध दारू गुटख्यासह दहा कोटी रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत पोलिसांनी जप्त केला आहे.







