सर्व गैरसमज दूर सारुन आम्ही गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी खंबीर – ज्ञानेश्वर महाजन | VIDEO

धरणगाव (उपसंपादक पी.एम.पाटील) : आजवर गुलाबराव देवकर यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभा होतो. पण मागच्या विधानसभा निवडणुकीत माझी पत्नी उमेदवार असतांना, त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे आम्हांला मते कमी पडली. मी पक्षश्रेष्ठींसमोर याविषयी दाद मागितली पण माझी दाद घेतली गेली नाही. आता मी संपूर्ण ताकदीनिशी गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी उभा राहून विश्वासघात करणाऱ्या गुलाबराव देवकरांना धडा शिकविणार आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाजन यांनी केले आहे.

 

यावेळी बोलतांना ज्ञानेश्वर महाजन पुढे म्हणाले की, गतकाळात गुलाबराव देवकर यांनी आपल्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचे शोषण केले आहे. अनेकांचे प्लॉट लिहून घेतले आहेत, काहींची प्रॉपर्टी ताब्यात घेतली आहे. त्यांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवत असतांना आमच्याशी विश्वासघात केल्याने, आम्हांला मते कमी पडले आणि परिणामी पराभव स्वीकारावा लागला.

 

 

आता आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला आम्ही आता घेणार असून, गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी भक्कपणे उभे राहून आमच्या समाजातर्फे व परिसरातर्फे त्यांना प्रचंड बहुमत देऊन, या परिसराच्या विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांचे हात बळकट करणार आहोत, असेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here