जयश्री महाजन यांचे बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन; स्त्रीशक्ती व युवाशक्तीचा मोठा सहभाग परिवर्तन घडवणार

जयश्री महाजन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जयश्री महाजन यांनी जळगाव शहरातून भव्य बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत शेकडो महिला आणि तरुणांनी सहभाग नोंदवत जयश्रीताईंना पाठिंबा दर्शवला.

 

 

शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान जयश्री महाजन यांनी नागरिकांना अभिवादन केले आणि आपल्या मशाल चिन्हाला भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले. जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखालील या शक्तिप्रदर्शनात महिलांनी भगवे फेटे घालून मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तरुणांनी विकासाच्या मुद्द्यांवर त्यांना पाठिंबा दर्शवला.

 

रॅलीत शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णुभाऊ भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरदआबा तायडे, जया तिवारी, नीता सांगोळे, ललिता पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाजन यांच्या बाईक रॅलीमुळे शहरात वेगळाच उत्साह दिसून आला. महिलांचा प्रचंड सहभाग आणि तरुण वर्गाचा पाठिंबा पाहून नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या की, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध स्त्रीशक्ती, युवाशक्ती आणि जनशक्ती अशा स्वरूपाची बनली आहे. लोकशाहीच्या वाटचालीत हा बदल नवा संदेश देणारा ठरतोय, असे रॅलीदरम्यान जळगावकरांनी मत व्यक्त केले. शहरातील नागरिकांनी या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला, त्यामुळे जयश्री महाजन यांच्या प्रचाराला अधिक उजाळा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here