अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवने यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

attack-on-candidate

खुलताबाद (प्रतिनिधी मुनीर शहा) : खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोचवणे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करून हल्ला केला. यात सोनवणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. सोनवणे हे सायंकाळी धामोरी बुद्रुक (ता. गंगापूर) येथे मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना मेहंदीपूर शिवारात अज्ञात पाच सहा लोकांकडून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

 

छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि.१८) जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी जाहीर सभा, कॉर्नर बैठका, दुचाकी रॅली, पदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता मतदानाला ३६ तास शिल्लक असल्याने या काळात गुप्त बैठकांवर भर राहणार आहे. त्याचबरोबर विरोधकांच्या हालचालींवरही बारीक लक्ष राहणार आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्यात आली आहे. सोमवार हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here